माळशिरस कृषी चषक – २०२६ स्पर्धेला सुरुवात

माळशिरस (बारामती झटका)
मे. आर. बी. माने ॲग्रो सर्व्हिसेस माळशिरस यांच्या वतीने माळशिरस कृषी चषक २०२६ या स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. १२/२/२०२६ ते शनिवार दि. १४/२/२०२६ रोजी पर्यंत करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मे. आर. बी. माने. ॲग्रो सर्व्हिसेस माळशिरस व ग्रीन डस्ट ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्यातर्फे ४१ हजार रु., द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कॅमीला बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे २५ हजार रु., तृतीय क्रमांकाचे बक्षीस बळीराजा कृषी केंद्र तांदुळवाडी व बळीराजा कृषी केंद्र कोळेगाव यांच्यातर्फे १५ हजार रु., चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस शेतकरी कृषी सेवा केंद्र अकलूज यांच्यातर्फे ११ हजार रु. असे असणार आहे. तसेच ग्रीन डस्ट ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी २२२२ देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी भोजन व पाण्याचे सौजन्य साईराज ॲग्रोसेल एजन्सी माळशिरस ४० हजार रु. देण्यात येणार आहेत. तर ट्रॉफी सौजन्य धनवे एंटरप्राईजेस तोंडले व कृष्णा ॲग्रो क्लीनिक मळोली, कॉमेंटेटर सौजन्य विश्वजीत कृषी केंद्र अकलूज, अंपायर सौजन्य श्री गणेश कृषी सेवा केंद्र मोरोची, कॅप सौजन्य महाफीड फर्टीलायझर पुणे, तर बॉल व स्टम्प सौजन्य जाधव कृषी सेवा केंद्र डोंबाळवाडी यांचे असणार आहे. तसेच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सुरज देशमुख महाफीड फर्टीलायझर्स शिव कृषी केंद्र हळदुगे ३० हजार रु. यांचे असणार आहे.


या स्पर्धेसाठी सुनील ट्रेडिंग कंपनी अकलूज ११ हजार रु., साईनाथ कृषी सेवा केंद्र वेळापूर ११ हजार रु., रणजीत कृषी केंद्र खुडूस ११ हजार रु., शेंडगे ॲग्रो एजन्सी माळशिरस ११ हजार रु., उमेश एजन्सी पिलीव ७ हजार रु., कृषीवैभव ॲग्रो एजन्सी माळशिरस ७ हजार रु., ओंकार ॲग्रो एजन्सी माळशिरस ७ हजार रु., शेतकरी कृषी सेवा केंद्र मांडवे ७ हजार रु., बालाजी कृषी केंद्र पिलीव ७ हजार रु., स्वराली कृषी केंद्र नातेपुते ५ हजार रु., रासकर कृषी केंद्र मांडवे ५ हजार रु., शिवपार्वती कृषी केंद्र कण्हेर ५ हजार रु., अविनाश कृषी सेवा केंद्र पाणीव पाटी ५ हजार रु. यांचे विशेष सहकार्य असणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आयोजकांशी संपर्क साधावा. तसेच या स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



