पिलीव पंचायत समिती गणाच्या सौ. नम्रता शिवराज पुकळे जाॅईंट किलर ठरल्या..

पालकमंत्री जयकुमार गोरे, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. आ. राम सातपुते यांची रणनीती यशस्वी…
जलनायक शिवराज पुकळे यांच्या शिवनेरी दहीहंडीने मोहिते पाटील यांची पिलीव भागातील राजकीय दहीहंडीच फोडली..
पिलीव (बारामती झटक)
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील जानकर गटासोबत महायुती सरकारमधील राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, आरपीआय आठवले गट या पक्षांसह अनेक छोटे-मोठे पक्ष व संघटना एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये निवडणूक पार पडलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पूर्व भागामध्ये पिलीव जिल्हा परिषद गटात मळोली गावचे चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या रूपाने जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा मळोली गावचा चंद्रकांत जाधव यांच्या रूपाने सूर्य उगवलेला आहे. तर पंचायत समिती गणाच्या सौ. नम्रता शिवराज पुकळे खऱ्या अर्थाने जाॅईंट किलर ठरलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांची राजकीय रणनीती यशस्वी ठरलेले आहे. पिलीव पंचक्रोशीमध्ये जलनायक शिवराज पुकळे यांच्या वतीने सामाजिक, राजकीय कार्याबरोबर शिवनेरी दहीहंडी आयोजित केली जाते. शिवनेरी दहीहंडीने मोहिते पाटील यांची पिलीव भागातील राजकीय दहीहंडीच फोडली, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे..

पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये पिलीव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सौ. याज्ञसिना संग्रामसिंह जहागीरदार व भारतीय जनता पार्टी कडून सौ. नम्रता शिवराज पुकळे यांच्यामध्ये लढत झालेली होती. पिलीव पंचायत समिती गणात पिलीव, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव या गावांचा समावेश होतो. मोहिते पाटील व जानकर गटाचे या गावांवर वर्चस्व असून संग्रामनंसिंह जहागीरदार यांनाही मानणारा मतदार असतानासुद्धा सौ. नम्रता शिवराज पुकळे यांचा दैदीप्यमान विजय झालेला आहे. संग्रामसिंह जहागीरदार यांचे राजकीय वलय मोठे आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते मावसबंधू आहेत. तर माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे मावस चुलते आहेत. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कृषी व पशुसंवर्धन सभापती पदावर काम केलेले आहे. पिलीव गावावर अनेक वर्ष सत्तेत कार्यकाल घालवलेला आहे. सोसायटी, पतसंस्था यांच्या माध्यमातून जनतेशी दांडगा संबंध होता.
शिवराज पुकळे यांचे झंजेवस्ती गाव आहे तरीसुद्धा, भारतीय जनता पार्टीने पिलीव पंचायत समिती गणामध्ये बाजी मारलेली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशदादा पाटील, माळशिरस मंडलचे अध्यक्ष तथा पिलीवचे सरपंच नितीन मोहिते माळी, भाजपचे पिलीव शहराध्यक्ष प्रमोदजी भैस यांच्यासह गणातील भाजपच्या निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साथ मिळालेली आहे.

पिलीव पंचक्रोशीतील उमलते नेतृत्व युवकांचे आधारस्तंभ सचिनदादा पडळकर यांच्यासह अनेकांची मोलाची साथ मिळालेली आहे. याचबरोबर नीरा देवधरचे पाणी 16 गावांसह बावीस गावांना मिळावे, यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज पुकळे यांनी पाणी संघर्ष लढा उभा केलेला होता. वेळोवेळी रास्ता रोको, आंदोलने केलेली होती. वेळप्रसंगी पाण्यासाठी रक्त दिलेले होते. असा चळवळीमधील राजकीय युवा नेता शिवराज पुकळे यांच्या सामाजिक कार्याचा सुद्धा फायदा झाला. शिवनेरी दहीहंडीच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केलेली होती.

शिवनेरी दहीहंडीच्या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनिया गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांनीही उपस्थित राहून शिवराज पुकळे यांची ताकद वाढवलेली होती.

जलनायक शिवराज पुकळे यांच्या शिवनेरी दहीहंडीने मोहिते पाटील यांची पिलीव भागातील राजकीय दहीहंडीच फोडली, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये चंद्रकांत जाधव यांच्या उमेदवारीमुळे पिलीव पंचायत समिती गणात सुद्धा ताकद वाढलेली होती. अशा सर्व गोष्टींमुळे पिलीव पंचायत समिती गणाच्या सौ. नम्रता शिवराज पुकळे जॉईंट किलर ठरल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



