माळशिरस नगरपंचायतीवर प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण नगराध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या शुभहस्ते होणार.

गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगराध्यक्ष ध्वजारोहण करणार….
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा ध्वजारोहण समारंभ रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.२० वा. या वेळेत माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष वस्ताद श्री. विजयराव बाजीराव देशमुख यांच्या शुभ हस्ते माळशिरस नगरपंचायत प्रांगणात साजरा करण्यात येत आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. कल्याण हुलगे यांनी आवाहन केलेले आहे.

दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरस येथे नगराध्यक्ष विजयराव देशमुख अशा मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात व दिमाखात संपन्न होणार आहे. योगायोगाने दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
माळशिरस नगरपंचायतीमध्ये सर्वात तरुण नगराध्यक्ष वस्ताद विजयराव देशमुख यांना प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.