माळशिरस नगरपंचायतीच्या रिक्त नगरसेवक पदाचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

रेश्माताई सूर्यकांत टेळे यांना जिल्हाधिकारी कार्यालय नगर परिषद प्रशासन शाखा प्रभारी सह आयुक्त डॉ. योगेश डोके यांनी नगरसेवक पदावर अपात्र केलेले होते….
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायतीच्या रिक्त नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याचा शुक्रवार दि. 20/2/2026 रोजी सुरू झालेला आहे. शुक्रवार दि. 27/02/2026 पर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. शुक्रवार दि. 06/03/2026 रोजी अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या आधीप्रमाणेच करून प्रसिद्ध करण्याचा निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. सुमित जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राप्रमाणे जाहीर केलेला आहे.
श्री. विजय बाजीराव देशमुख रा. माळशिरस, ता. माळशिरस यांनी सौ. रेश्माताई सूर्यकांत टेळे रा. माळशिरस, ता. माळशिरस यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर नगरपरिषद प्रशासन शाखा प्रभारी सह आयुक्त डॉ. योगेश डोके यांनी क्र. 2025/ नपप्रवि/नवी-6/कावि – 444 विवाद अर्ज नं. 2/2022 दि. 23/09/2025 रोजी पत्रान्वये महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 (1) तसेच महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम 1987 चे नियम 6 अन्वये दाखल केलेल्या अर्जावर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. सामनेवाला यांना या आदेशाच्या निकालापासून माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक म्हणून पुढील कालावधीसाठी अनर्ह ठरविण्यात येत आहे, अशी संबंधितांना निकालाची समज द्यावी, असे पत्र देऊन सदरचे पत्र मुख्याधिकारी यांना देण्यात आलेले होते.
प्रभाग क्रमांक 11 मधून स्थानिक विकास आघाडी मधून सौ. रेश्मा सूर्यकांत टेळे निवडून आलेल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लेटर पॅड वापरले, तक्रारी अर्ज दाखल केलेला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीची नगरसेवक पदाची रिक्त झालेली जागा होती. सदर जागेच्या प्रारूप मतदार यादीला सुरुवात झालेली असल्याने पोटनिवडणूक निश्चित आहे.
माळशिरस नगरपंचायतीच्या तत्कालीन नगरसेविका सौ. रेश्माताई सूर्यकांत टेळे यांनी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी कायम सभागृहामध्ये आवाज उठविलेला होता. प्रभागातील प्रश्नांसाठी त्या आग्रही राहत असत. त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविल्यानंतर प्रभागातच नव्हे तर माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये चर्चेचा विषय ठरलेला होता. पोट निवडणूक सुरू झालेली आहे. अपात्र केलेले असल्याने सहा वर्ष रेश्मा ताई टेळे यांना निवडणुकीत उभा राहता येत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सूर्यकांत उर्फ सुरेशभाऊ टेळे यांचा निर्णय अंतिम असणार आहे. श्री. सुरेशभाऊ टेळे यांच्या धर्मपत्नी सौ. रेश्माताई टेळे आहेत. माळशिरस नगर पंचायतची मुदत काही महिन्यांवर आलेली आहे. पोटनिवडणूक ही नगरपरिषदेच्या निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. माळशिरस शहरात नगर विकास आघाडी माध्यमातून नेते व कार्यकर्ते एकमेकांना जोडले जात आहेत.
पोटनिवडणुकीत कशा पद्धतीने सामना रंगेल, याच्यावर नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे माळशिरस तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे माळशिरस नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागून राहणार आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



