माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर यांची मल्हार साखर कारखान्याला सदिच्छा भेट…

ग्रामीण भागात धनगर समाजातील व्यक्तीच्या भव्य प्रोजेक्टला भरभरून शुभेच्छा दिल्या…
चांदापुरी (बारामती झटका)
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेवरावजी जानकर यांनी चांदापुरी येथील जय मल्हार साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी मल्हार साखर कारखान्याचे चेअरमन काशिनाथरावजी देवकाते पाटील यांनी स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
माजी मंत्री महादेवरावजी जानकर यांनी चांदापुरीच्या माळरानावर भव्यदिव्य प्रोजेक्ट पाहिल्यानंतर समाधान व्यक्त केलेले आहे. ग्रामीण भागात धनगर समाजातील व्यक्तीच्या भव्य दिव्य प्रोजेक्टला भरभरून शुभेच्छा दिल्या. व्यस्त असताना सुद्धा मल्हार कामातून वेळ काढून साखर कारखान्यावर चेअरमन काशिनाथरावजी देवकाते पाटील यांच्याशी बराचवेळ मनमोकळेपणाने सुसंवाद साधला…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



