पत्रकार प्रकाश केसकर यांचा स्तुत्य उपक्रम

श्रीपूर (बारामती झटका)
दर शनिवारी श्रीपूर, ता. माळशिरस मधील ग्रामदैवत व पंचक्रोशीतील प्रसिद्ध दैवत प्रभू रामचंद्र भक्त हनुमान यांची पुजा व पुष्पहार अर्पण करून नैवेद्य म्हणून केळी, महाप्रसाद शिरा दर शनिवारी हनुमान भक्त जे देतात त्यांचा फोटो व नाव सर्व व्हाट्सअप ग्रुप वर देऊन घर बसल्या अनेकांना श्रीपूर मधील हनुमानाचे दर्शन व संबंधित भक्तांचे नाव फोटो प्रसिद्ध करण्याची सुरुवात पत्रकार प्रकाश केसकर यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे.
हा उपक्रम निश्चितच स्तुत्य व धार्मिक अध्यात्मिक परंपरा जोपासणारा आहे. श्रीपूर बाहेरील अनेकांना मुळ श्रीपूरकर परंतु नोकरी धंद्याच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात स्थलांतरित झालेल्या श्रीपूरकरांना दर शनिवारी श्रीपूर मधील हनुमानाचे दर्शन व भक्तांचा फोटो पाहून समाधान होत असल्याची आनंदाची पर्वणी ठरत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



