ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोहिते पाटील गटाला खिंडार, उपसभापती मामासाहेब पांढरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी असंख्य कार्यकर्तेंसह जाहीर पक्ष प्रवेश..

नातेपुते (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दि. 20/10/2026 रोजी श्रीराम बंगला निवासस्थानी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती जननायक बापूराव उर्फ मामासाहेब नारायण पांढरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश असंख्य कार्यकर्त्यांसह होणार असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोहिते पाटील गटाला राजकीय खिंडार पडणार आहे…

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती मामासाहेब पांढरे या दोघांनी मोहिते पाटील गटाची राजकीय खिंड लढवलेली होती. बाबाराजे देशमुख यांनी काही महिन्यापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला होता. बाबाराजे यांच्यामुळे मोहिते पाटील गटाचा बुरुज ढासळलेला होता. आता मात्र मामासाहेब पांढरे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष प्रवेशाने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोहिते पाटील गटाला खिंडारच पडणार आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button