ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यातील ग्रामसेवक अँटी करप्शनच्या जाळ्यात…

मंजूर करून आणलेल्या कामात ढवळाढवळ करून पैशाची मागणी, ठेकेदाराची त्रासाला कंटाळून अँटीकरप्शनकडे तक्रार…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समिती अंतर्गत माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामसेवक अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेले आहेत. ते 46,500 रुपये लाच मागत होते. त्यापैकी पहिला टप्पा 26,500 घेत असताना अँटीकरप्शन विभागाने रंगेहात पकडलेले आहे. सदरचा गुन्हा नातेपुते पोलीस स्टेशन येथे नोंदविण्याचे काम सुरू आहे..

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील महिला ग्रामसेवक असल्याची माहिती समोर आलेली आहे. सदरच्या ग्रामसेवकांनी जाणीवपूर्वक ठेकेदारांना त्रास दिलेला आहे. ठेकेदारानी मंजूर करून आणलेली कामे दुसऱ्याला विकलेली आहेत, असाही आरोप तक्रारदारांकडून होत आहे.

कामांमध्ये प्रचंड त्रास दिलेला असल्याने त्रासाला कंटाळून ठेकेदार यांनी अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केलेली होती. 46,500 रक्कम ठरलेली होती. त्यापैकी 26,500 रकमेचा पहिला हप्ता देत असताना अँटीकरप्शन विभागाने पकडले आहे. सदरच्या घटनेचा नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button