ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची AI द्वारे बनावट फोटो बनवून बदनामी; जनसंपर्क अधिकारी अमरसिंह मोकाशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

सातारा (बारामती झटका)

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सातारा-जावली विधानसभेचे आमदार ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सोशल मीडियावर AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून बदनामी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी अमरसिंह मोकाशी (वय ५०, रा. कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या ‘राजधानी सातारा दहीहंडी उत्सव २०२६’ कार्यक्रमा दरम्यानचा ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एक फोटो AI, डिजिटल एडिटिंग आणि मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून एडिट करण्यात आला. मूळ फोटोमध्ये फेरफार करून बिभत्स आणि बनावट फोटो तयार करण्यात आला व तो सोशल मीडियावर प्रसारित करून महाराजांच्या वंशजांची तसेच लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला.

या सोशल मीडिया अकाउंट्सवर गुन्हा दाखल:
तक्रारदार अमरासिंह मोकाशी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात खालील सोशल मीडिया हँडल्स आणि खातेदारांवर भारतीय न्याय संहिता (BNS) ३५३(२), ३५६(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) ६७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:

Pratik Thorat – देशभक्त Gen Z (फेसबुक अकाउंट/पेज)
Sonalie Deshmukh (फेसबुक प्रोफाइल)
Hari Shinde (फेसबुक प्रोफाइल)

या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन गणपतराव म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button