ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

समाजकल्याण सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्या कार्यकर्तुत्वाचा सन्मान संपन्न झाला….

श्रीराम निवासस्थानी जनता दरबारामधून सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या प्रश्नाला वाचा फोडली..

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील
श्रीराम निवासस्थानी दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांच्या नागरिकांच्या समस्या व भेटीगाठीसाठी जनता दरबाराचे आयोजन केलेले होते. सदरच्या जनता दरबारात ग्रामपंचायत संगणक परिचालक बंधु-भगिनी भेटीस आले होते. जनता दरबारामध्ये त्यांनी अनेक महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेल्या मानधनाच्या प्रश्नाबाबत आपली अडचण मांडली होती.

संस्कृतीताई सातपुते यांनी गांभीर्याने दखल घेऊन सदर प्रश्न जिल्हा परिषद सोलापूरच्या सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर मांडला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे मानधनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करून याविषयात सातत्याने पाठपुरावा केला.

पाठपुराव्याला यश आले असून, माळशिरस तालुक्यातील ३० पेक्षा जास्त आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १९० पेक्षा जास्त ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा प्रलंबित मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याचे समाधान आज त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन संगणक परिचालक बंधु-भगिनींना दिले.

संस्कृतीताई यांची कार्याची पद्धत, आलेल्या जनतेचे, नागरिकांचे समाधान करणे, नागरिकांनी मांडलेला प्रश्न सातत्याने पाठपुरावा करत तो प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रयत्न करणे, लोकांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहणे, यापेक्षा मोठे समाधान दुसरे नाही.

मानधनाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल संगणक परिचालक बंधु-भगिनींनी आज श्रीराम निवासस्थानी समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांचा सत्कार केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना संस्कृतीताई म्हणाल्या, सत्कार माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. त्यांच्या या विश्वासाबद्दल मनापासून धन्यवाद!

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button