ताज्या बातम्याराजकारण

मोहिते पाटील यांचा “माढ्याचा खासदार आम्हीच निवडून आणला” दावा मोडीत काढण्याकरता भाजप व महायुती कामाला लागली…

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुतीने माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी दिली.

माळशिरस (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अनेक घटक पक्षांच्या महायुतीने माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या गतवेळच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य देण्यामध्ये शिवरत्न मोहिते पाटील, प्रतापगड मोहिते पाटील व माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील पारंपारिक विरोधी गट यांनी एकत्र येऊन लोकसभेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य दिलेले होते. मात्र, शिवरत्नवरील मोहिते पाटील डोंगरा पिटत आहेत, माढ्याचा खासदार आम्हीच निवडून आणला. जर एक लाखाचे मताधिक्य दिले नसते तर निवडून आले नसते. अशा पोकळ वलगणांचा दावा मोडीत काढण्याकरता भाजप व महायुतीचे लोकप्रतिनिधी व नेते कामाला लागलेले आहेत. त्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय रयत क्रांती शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत.

गतवेळच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी रामराजे निंबाळकर, बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, दीपकआबा साळुंखे पाटील विरोधात होते. तर मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधक सोबत होते.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परिवारातील धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना भाजप महायुतीने उमेदवारी नाकारलेली आहे. त्यामुळे मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांनी महायुतीचा धर्म असताना सुद्धा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अपप्रचार सुरू केलेला आहे. मोहिते पाटील यांच्या बदल्यात यंदाच्या निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, मकाई कारखान्याच्या चेअरमन रश्मीताई बागल यांच्यासह गतवेळच्या निवडणुकीत सोबत नसलेले या निवडणुकीत सोबत असल्याने मोहिते पाटील यांच्या ताकतीपेक्षा जास्त ताकद निर्माण झालेली असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीस माढ्याचा खासदार आम्हीच निवडून आणला असा दावा मोहिते पाटील यांचा आहे. मोहिते पाटील यांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना समर्थन नसताना सुद्धा निवडून आणून गेल्या वेळेपेक्षा मताधिक्याने निवडून आणू शकतो. यासाठी भाजप व महायुतीचे नेते व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. तर, पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील सिंचन, रेल्वे, रस्ते यांसह अनेक प्रश्न मार्गी लावलेले असल्याने मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे‌. यामुळे माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय निश्चितच आहे. फक्त मताधिक्य किती याची उत्सुकता लागून राहिलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort