मोहिते पाटील यांच्या कुटील, विश्वासघातकी व एकाधिकार शाहीला कंटाळून राजकीय तिसरा घटस्फोट…

जुलमी राजकीय व्यवस्थेला रणजीतसिंह नाईक निंबाळकर, रामभाऊ सातपुते, उत्तमराव जानकर यांनी झुगारून स्वाभिमानी बाणा सिद्ध केला…
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय घडामोडीला वेग आलेला आहे. मोहिते पाटील यांच्या कुटील, विश्वासघातकी व एकाधिकार शाहीला कंटाळून माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे आ. उत्तमराव जानकर यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहून प्रसारमाध्यमांशी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या कुटील, विश्वासघातकी व एकाधिकारशाहीला कंटाळून राजकीय तिसरा घटस्फोट झाला असल्याची राजकीय वर्तुळामध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे…
शिवरत्नवरील मोहिते पाटील यांनी राजकारण करताना सोयीनुसार राजकारण केलेले आहे. राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन पक्ष बदलत असतात शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अशा पक्षांमध्ये राजकारण केलेले आहे. राजकीय परिस्थितीनुसार होकायंत्र प्रमाणे राजकीय दिशा ओळखून राजकीय वाऱ्यात वाहत असतात. मात्र, आम्हीच वाऱ्याला दिशा देतो, अशा अविर्भावात वावरत असतात.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या निवडणुकीत पक्षाचे काम करून विधानपरिषद पदरात पाडून घेतलेली होती. मात्र, खासदार व आमदार आमच्यामुळेच निवडून आले अशा अविर्भावात शिवरत्न चा राजकीय प्रवास सुरू होता. फक्त शिवरत्नमुळे खासदार व आमदार निवडून आलेले नव्हते. तरीसुद्धा फाजील आत्मविश्वासाने अधिकार गाजवत होते.
दोन वर्षांनी खरे रूप पहावयास मिळाल्याने तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी फारकत घेतलेली होती. भाजपने फुकटात विधानपरिषद दिलेली असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये पक्षप्रवेश करून लोकसभेची खासदारकी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पदरात पाडून घेतलेली होती. त्या वेळेला उत्तमराव जानकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत उत्तमराव जानकर यांना सहकार्य झालेले होते. मात्र, उत्तमराव जानकर आमदार होताना मोहिते पाटील यांच्या सहकार्यावरच न होता स्वतःचीही राजकीय ताकद असल्यामुळे आमदार झालेले होते. दोन वर्षाच्या कालावधीमध्ये बरेचसे पुलाखालून पाणी गेलेले होते. घोरपडीन बाई तुझीच पाठ मऊ अशा पद्धतीने राजकीय वाटचाल सुरू होती.
आमदार उत्तमराव जानकर चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोहिते पाटील यांची राजकीय तिरकी चाल ओळखली. मोहिते पाटील यांच्या मर्जीतील वसंत नाना देशमुख यांना उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याने वेगळी भूमिका घेतलेली आहे. मोहिते पाटील यांच्या उमेदवाराला समर्थन व सहकार्य न करता महायुतीचे राजेंद्र राऊत यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. आजपर्यंत मोहिते पाटील यांच्या कुटील, विश्वासघातकी एकाधिकार शाहीला कंटाळून मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मा. आमदार रामभाऊ सातपुते यांनी राजकीय घटस्फोट घेतला होता. सध्या विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी घटस्फोट दिल्याने मोहिते पाटील यांच्या कुटील, विश्वासघातकी व एकाधिकारशाहीला कंटाळून राजकीय तिसरा घटस्फोट असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



