ताज्या बातम्याराजकारण

आ. उत्तमराव जानकर यांच्या निर्णयाचे स्वागत भाजप नेते प्रकाशबापू पाटील यांनी केले…

महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जाहीर पाठिंबा…

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर हॉटेल बालाजी सरोवर येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे माळशिरस विधानसभा आमदार उत्तमराव जानकर यांनी सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणुकीचे अधिकृत उमेदवार बार्शीचे माजी आमदार राजेंद्र उर्फ राजाभाऊ यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिलेला होता.

आमदार उत्तमराव जानकर यांच्या निर्णयाचे स्वागत माळशिरस विधानसभेचे परिवर्तनवादी धाडसी माजी आमदार स्वर्गीय शामराव पाटील यांचे चिरंजीव भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रकाशबापू पाटील यांनी केले.

यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव तथा भाजपचे युवा नेते अभिषेक भैया पाटील, भाजपचे तालुका संघटक डॉक्टर निलेश ननवरे आदी उपस्थित होते..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button