ताज्या बातम्याराजकारण

मोहिते पाटील यांच्या विश्वासघातकी व जुलमी राजकीय व्यवस्थेला उध्वस्तीची सुरुवात संघर्षयोध्दा राम सातपुते यांनी केली….

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आलेला आहे…

मुख्यमंत्री देवाभाऊ आणि पालकमंत्री जयाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ यांनी पेटवलेली वात राजाभाऊंच्या रूपाने मिसाइल बनणार..

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांच्या विश्वासघातकी व जुलमी राजकीय व्यवस्था एकाधिकारशाही याविषयी जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नव्हते. यांच्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार संघर्षयोद्धा राम सातपुते यांनी राजकीय व्यवस्थेला उध्वस्तीची सुरुवात केलेली होती. सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडी वेगाने घडत गेल्याने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे योग्य नियोजन केलेले असल्याने मुख्यमंत्री देवाभाऊ आणि पालकमंत्री जयाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ यांनी पेटवलेली वाद राजाभाऊंच्या रूपाने मिसाईल बनणार अशी राजकीय वर्तुळामध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे.

शिवरत्न वरील मोहिते पाटील यांनी राजकारण करताना सोयीनुसार राजकारण केलेले आहे. राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन पक्ष बदलत असतात. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, आय राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अशा पक्षांमध्ये राजकारण केलेले आहे. राजकीय परिस्थितीनुसार होकायंत्राप्रमाणे राजकीय दिशा ओळखून राजकीय वाऱ्यात वाहत असतात मात्र, आम्हीच वाऱ्याला दिशा देतो, अशा अविर्भावात वावरत असतात.

जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन पर्यायी नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी मोहिते पाटील यांच्या राजकीय कुरघोड्या नाइलाजाने सहन केलेल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांशी संबंध ठेवून सर्व ठिकाणी हात ठेवून होते. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची मोहिते पाटील यांच्या विश्वासघातकी व जुलमी राजकीय व्यवस्थेच्या विरोधात कोणीही जात नव्हते. मात्र, संघर्षयोद्धा राम सातपुते यांनी सुरुवात केलेली होती.

सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील यांची उतरती कळा लागलेली होती. अशातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोहिते पाटील यांचे दुटप्पी राजकारण उघडे पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार यांनी उघडपणे महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना समर्थन दिलेले आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमच्या घरातील विषय आहे आम्ही घरात संपवू असे म्हणणारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना घरचाच आहेर मिळालेला आहे.

आमदार उत्तमराव जानकर, आमदार नारायण आबा पाटील, आमदार अभिजीत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त करून राजाभाऊ राऊत यांना राजकीय समर्थन दिलेले असल्याने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आलेला समाज माध्यमांमधून पहावयास मिळत आहे.

अशा सर्व राजकीय घडामोडी घडत गेल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र उर्फ राजाभाऊ राऊत यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ आणि पालकमंत्री जया भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ यांनी पेटवलेली वात राजाभाऊंच्या रूपाने मिसाईल बनणार आणि मोहिते पाटील यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button