ताज्या बातम्याराजकारण

वैराग नगरपरिषदेच्या सर्वच्या सर्व 15 नगरसेवकांचा भाजप महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना जाहीर पाठिंबा

वैराग (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैराग येथील नेते निरंजन भुमकर मालक यांनी वैराग नगरपरिषदेच्या सर्वच्या सर्व 15 नगरसेवकांसह सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार मा. आ. राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला.

यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी भाऊ पवार, नाना धायगुडे मेंबर, वैराग भागाचे नेते संतोष दादा निंबाळकर, वैजनाथ आदमाने, पत्रकार किरण आवारे यांच्यासह वैराग नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “वैराग नगरपरिषदेचा हा एकगठ्ठा पाठिंबा महायुतीच्या विजयाची नांदी आहे. राजेंद्र राऊत यांच्या रूपाने सोलापूरला अभ्यासू व विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व विधानपरिषदेत मिळणार आहे.

नेते निरंजन भुमकर यांनी सांगितले की, महायुती सरकारच्या विकासकामांवर विश्वास ठेवून व राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून आम्ही सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. वैराग शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button