ताज्या बातम्यासामाजिक

मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब बळीराम क्षीरसागर यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड

मोहोळ (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून

मोहोळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा अंकोली गावचे सुपुत्र बाबासाहेब बळीराम क्षीरसागर यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड झाली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या असणाऱ्या संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ही निवड केली आहे.

मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये असणारे भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली या शाळेचे ते शाळा समितीचे सदस्य म्हणून काम करत आहेत. या काळात रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागातील एक सर्वोत्तम विद्यालय व्हावे, म्हणून बाबासाहेब क्षीरसागर यांनी अथक प्रयत्न केले आहेत. राज्यातील पहिली गणित प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षेचे माहेरघर, राज्यात सर्वात जास्त स्पर्धा परीक्षेला लागणारी विद्यार्थी, व्यवसाय शिक्षण व अनिवासी गुरुकुल, उत्तम सुंदर इमारत अशा अनेक कामांमध्ये बाबासाहेब क्षीरसागर यांचा अनमोल असा वाटा राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय चेअरमन संजीव पाटील व संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अंकोली पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button