ताज्या बातम्यासामाजिक

नातेपुते पोलीस व अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई; धर्मपुरी येथे ५७ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम…

नातेपुते (बारामती झटका)

मौजे धर्मपुरी, (ता. माळशिरस) येथे करण्यात आलेल्या छाप्यात सुमारे ५७,३४८/- रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला असून, आरोपी लखन पोपट लोंढे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​घटनेचा तपशील:
​अन्न व औषध प्रशासन, सोलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश मल्हारी लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी पहाटे ०१:०० वाजेच्या सुमारास नातेपुते पोलीस व अन्न सुरक्षा पथकाने मौजे धर्मपुरी येथे आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी मानवी आरोग्यास अपायकारक आणि शासनाने विक्रीस बंदी घातलेला विमल, आर.एम.डी., डायरेक्टोर पानमसाला व विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले.

​जप्त केलेला मुद्देमाल:
​या कारवाईत एकूण ५७,३४८/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये विमल पानमसाला (लहान व मोठे), डायरेक्टोर, आर.एम.डी. पानमसाला, शॉट सुगंधित तंबाखू, व्ही १ आणि एम गोल्ड तंबाखूच्या पाकिटांचा समावेश आहे.

​कायदेशीर कारवाई:
आरोपी लखन पोपट लोंढे (रा. धर्मपुरी) याने अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमान्वये नातेपुते पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​तपास पथक व वरिष्ठ मार्गदर्शन:
​सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. विशाल वायकर, पोसई सोनल मोरे, सहा. पोलीस फौजदार देविदास धोत्रे, पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस नाईक अमोल वाघमोडे, पोका / सचिन चव्हाण, संतोष वारे, यांनी केली आहे. ​या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अमोल वाघमोडे हे करत आहेत.

​नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button