पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

निधी देत नाही, अशी बोंबाबोंब करणाऱ्यांना सर्वात जास्त माळशिरस तालुक्याला निधी देऊन दिली चपराक
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतीहासीक विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील लोकांनी भारतीय जनता पार्टीवर आणि पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मंत्री गोरे यांनी केंद्रीय वित्त आयोगातून जिल्हा परिषदेसाठी १४ कोटी ६१ लाख तर ११ पंचायत समितीच्या सदस्यासाठी जवळपास १४ कोटी ६१ लाख असे तब्बल २९ कोटी २२ लाख रुपये देण्याचे अभिवचन दिले होते तो शब्द मंत्री गोरे यांनी पुर्ण केला असून नवनिर्वाचित सदस्यांना विकासनिधीचे अनोखे गिफ्ट दिले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये पालकमंत्री गोरे यांनी जनतेला विकासासाठी थेट निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. सदर आश्वासन हे केवळ निवडणूकीपुरते न ठेवता निवडणूकीनंतर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे सुतोवाच गोरे यांनी केले होते. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गोरे यांनी त्यांच्याकडे असलेल्या महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून दि. २३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्रीय वित्त आयोगाचे अनुदान सोलापूर जिल्हा परिषदेस १४ कोटी ६१ लाख इतका निधी तसेच जिल्ह्यातील ११ पंचायत समिती यांना एकुण १४ कोटी ६१ लाख असे एकुण सोलापूर जिल्ह्यास २९ कोटी २२ लाख इतका निधी प्राप्त झाला आहे.

त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी मंत्री गोरे यांचे कोतुक करत आभार व्यक्त केले आहे. सदर निधी हा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात खर्च होणार असल्याने सर्वसामान्य जनतेनेही पालकमंत्री गोरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



