ऑक्टोबरमध्ये बँका १५ दिवस राहणार बंद

दसरा, दिवाळी अन् सणांची रेलचेल; आधीच नियोजन करा…
मुंबई (बारामती झटका)
दसरा, दिवाळीसह इतर सण, उत्सव व साप्ताहिक सुट्या यांमुळे ऑक्टोबर २०२४ मध्ये बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र, या सर्व सुट्या सर्व राज्यांत नसतील. राज्यानुसार सण भिन्न असल्यामुळे सुट्यांची संख्याही भिन्न असेल.
सुट्या लक्षात घेऊन आपल्या आर्थिक कामांचे नियोजन नागरिकांनी करावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. ऑक्टोबरमधील सुट्यांत शनिवार-रविवार, जम्मू-काश्मिरातील विधानसभा निवडणूक, गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजन, काटी बिहू यांचा समावेश आहे.
सुट्यांच्या काळात यूपीआय, नेट बँकिंग अथवा मोबाइल बँकिंग व एटीएम सेवा सुरू राहील.
कोणत्या दिवशी कोणत्या राज्यात सुट्टी ?
१ ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक (जम्मू)
२ ऑक्टोबर : गांधी जयंती (देशभर)
३ ऑक्टोबर : नवरात्र स्थापना (जयपूर)
१० ऑक्टोबर : दुर्गापूजा, दसरा, महासप्तमी (आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा, कोलकाता)
११ ऑक्टोबर : दसरा, महाअष्टमी, महानवमी इ. (आगरतळा, बंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, ईटानगर, कोहिमा, कोलकाता, पाटणा, रांची आणि शिलाँग)
१२ ऑक्टोबर : दसरा, विजयादशमी, दुर्गापूजा (जवळपास संपूर्ण देशात)
१३ ऑक्टोबर : रविवार (देशभर)
१४ ऑक्टोबर : दुर्गापूजा, दासेन (गंगटोक)
१६ ऑक्टोबर : लक्ष्मीपूजन (आगरतळा, कोलकाता)
१७ ऑक्टोबर : महर्षी वाल्मीकी जयंती व काटी बिहू (बंगळुरू, गुवाहाटी)
२० ऑक्टोबर : रविवार (देशभर)
२६ ऑक्टोबर : चौथा शनिवार (देशभर)
२७ ऑक्टोबर : रविवार (देशभर)
३१ ऑक्टोबर : दिवाळी (देशभर)

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.