ताज्या बातम्यासामाजिक

पती-पत्नी सांभाळणार सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी; सनदी अधिकारी जैन दाम्पत्य चर्चेत !

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूरच्या नव्या पोलीस उपायुक्त (DCP) वृष्टी जैन यांची नियुक्ती झाली असून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुशल जैन यांच्या त्या पत्नी आहेत. त्यामुळे आता सोलापूर जिल्हा परिषद आणि सोलापूर पोलीस दल अशा दोन्ही महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये हे सनदी अधिकारी दांपत्य कार्यरत राहणार आहे. जिल्ह्याची जबाबदारी आता पती-पत्नीवर आली आहे.

वृष्टी जैन यांनी 19 डिसेंबर 2022 रोजी अधिकृतपणे भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश केला. प्रशिक्षणासह जवळपास चार वर्षांचा सेवाकाळ त्यांनी पूर्ण केला असून, आपल्या कामकाजातून त्यांनी प्रभावी छाप पाडली आहे. 9 सप्टेंबर 2024 पासून त्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड उपविभागात जबाबदारी सांभाळत होत्या. आता सोलापूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेत समन्वयाचे नवे पर्व सुरू होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पती कुशल जैन हे सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO म्हणून कार्यरत असून, दोघेही एकाच जिल्ह्यात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहणार असल्याने “आयएएस-आयपीएस जैन दाम्पत्य” सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button