ताज्या बातम्याराजकारण

राष्ट्रवादीला भाजपचा धक्का; माण-खटावमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा जाहीर पक्षप्रवेश..

बोराटवाडी (बारामती झटका)

माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील गणेशवाडी (वडूज), पिंपळवाडी आणि करमारवाडी (ता. खटाव) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. बोराटवाडी (ता. माण) येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करताना, “भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. गावातील व परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील,” असे सांगितले.

तसेच राष्ट्रीय विचारधारा अधिक बळकट करून खटाव तालुका, सातारा जिल्हा आणि महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने अग्रेसर करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. हा पक्षप्रवेश सोहळा सौ. सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक आणि विविध गावांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये दौलतराव बरकडे, विठ्ठल बरकडे, अंकुश राऊत, स्वाती शिंगाडे, जनार्दन गलंडे, नारायण गलंडे, शिवाजी करमारे, मनोहर साळुंखे, बाळकृष्ण बरकडे, गंगाराम गलंडे, धनाजी भिसे, सचिन गलंडे, लक्ष्मण नारनवर, संदीप गलंडे, अमोल माने, प्रकाश गलंडे, रणजीत करमारे, अशोक शिंगाडे आदींसह अनेकांचा समावेश होता.

या पक्षप्रवेशासाठी कुंडलिक राऊत, सोमनाथ घाडगे, रमेश बुरुंगले, वैभव बुरुंगले, अमर साळुंखे, गोरख काळे, दीपक कारंडे, धनश्री राऊत आदींनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमाला भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजयशेठ शितोळे सरकार, डॉ. विवेक देशमुख, माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे, प्रदीप खुडे, सुरज शितोळे-सरकार, अक्षय थोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button