ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. श्री. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे मळोली, पिंपळाचा मळा येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. सरुबाई जाधव यांच्या पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

मळोली (बारामती झटका)

कै. सरुबाई मधुकर जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दि. १९/५/२०२६ रोजी मु. पो. मळोली, पिंपळाचा मळा, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. श्री. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विजय मधुकर जाधव व अनंतराव मधुकर जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button