ताज्या बातम्यासामाजिक

विभागीय आयुक्तपदी शीतल तेली-उगले यांची नियुक्ती

सोलापूर (बारामती झटका)

महाराष्ट्र शासनाने २००९ बॅचच्या आयएएस अधिकारी शीतल तेली-उगले यांची पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी या पदाचा कार्यभार माजी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवाड यांच्याकडून स्वीकारला. दि. 21 नोव्हेंबर 2022 पासून दि. 21 मे 2025 पर्यंत शितल तेली या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

शीतल तेली-उगले या यापूर्वी पुण्यातच क्रीडा व युवा सेवा आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. प्रशासकीय अनुभव आणि विविध विभागांतील कामकाजामुळे त्यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवाड यांची मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या या प्रशासकीय बदलामुळे पुणे विभागाच्या प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button