ताज्या बातम्यामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

खंडाळीतील अंगणवाडी सेविका सुप्रिया भोसले यांच्या राख्या पोस्टाने जवानांसाठी रवाना

खंडाळी (बारामती झटका)

खंडाळी, भोसलेवस्ती ता. माळशिरस येथील अंगणवाडी सेविका सुप्रिया भोसले यांनी भाऊ बहिणीच्या प्रेमाचा व अतुट नात्याचा सण रक्षाबंधन निमित्त देशाचेरक्षक, जवान, सैनिक यांना खंडाळी पोस्ट कार्यालयामार्फत पुणे येथे २१ राख्या पाठवल्या. उन, वारं, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस तैनात असलेले जवान सैनिक यांना अनेक सण कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागतात.

भाऊ-बहीणीच्या प्रेमाचा हा अतुट नात्याचा सण रक्षाबंधन असो किंवा वर्षभरात येणारे कोणतेही सण असो, भारतमातेच्या संरक्षणाच्या जबाबदारीला ते पहिले प्राधान्य देतात. त्यांच्यामुळेच भारतातील 140 कोटीहून अधिक लोकं सुखी, आनंदी आहेत. आनंदाने सर्व सण कुटुंबासोबत साजरे करतात. पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत असताना जवानांना, सैनिकांना अनेक सण कुटुंबापासून दूर सीमेवर साजरे करावे लागतात.

अंगणवाडी सेविका सुप्रिया भोसले यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही बहिणीच्या प्रेमाची राखी मिळावी, या उदात्त हेतूने २१ राख्या भावांसाठी पाठविल्या. पुढच्या वर्षी सैनिक भावांसाठी विविध ठिकाणी १०१ राख्या पाठवणार आहेत. टपालाद्वारे राख्या पाठवण्यासाठी खंडाळी पोस्ट कार्यालयातील गणेश माळी व शौकत तांबोळी यांनी विशेष सहकार्य केले.
-शरद भोसले (सर) खंडाळी

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button