ताज्या बातम्यासामाजिक

सदाशिवनगर साखर कारखान्याच्या विस्तारीकरण आसवानी प्रकल्पाला पीडित नागरिक शेतकरी यांचा तीव्र विरोध…

पदाधिकारी व नेते हवेत, नागरिक मात्र दूषित व खराब पाण्यात.. दूषित पाण्याचा बंदोबस्त करा आणि मगच विस्तारीकरण करा, स्थानिक नागरिकांचा इशारा…

सदाशिवनगर (बारामती झटका)

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड पो. सदाशिवनगर गाव पुरंदावडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर या कारखान्याचा प्रस्तावित मोलेंसिस (B व C) वर आधारित विस्तारीकरण आसवानी प्रकल्प क्षमता 30 कि.ली प्रतिदिन वरून 45 कि.ली. प्रतिदिन पर्यंत तसेच प्रस्तावित विस्तारीकरण ऊस गाळ क्षमता 2500 मे. टन. प्रतिदिन वरून 7000 हजार मे.टन प्रति दिन ची स्थापना करण्याबाबत दि. 18/05/2026 रोजी जाहीर जन सुनावणीसाठी सह संचालक (जप्रनि) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुख्यालय यांना पत्रव्यवहार केलेला असून सदर प्रकल्पाबाबत काही सूचना, मत, टीका टिप्पणी किंवा आक्षेप लेखी स्वरूपात दि. 18/05/2026 रोजी प्राप्त झाल्यास त्याची नोंद घेऊन या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावेत. असा पत्रव्यवहार निखिल मोरे उपप्रादेशिक अधिकारी सोलापूर यांनी दि. 16/04/2026 रोजी पत्र व्यवहार केलेला आहे.

याबाबत जाहीर नोटीस दि. 18/04/2026 रोजीच्या दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रांमध्ये इंग्रजी भाषेत तसेच दैनिक संचार या वृत्तपत्रांमध्ये मराठी भाषेमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सदर प्रकल्पाची पर्यावरण विषयक जाहीर जन सुनावणी सोमवार दि. 18/5/2026 रोजी दुपारी चार वाजता मी श्री शंकर सहकारी साखर कारखाना या कारखाना प्रकल्प स्थळावर आयोजित करण्यात आलेली आहे. सदाशिवनगर साखर कारखान्याच्या विस्तारीकरण आसवानी प्रकल्पाला पीडित नागरिक शेतकरी तसेच पर्यावरण विषयी काम करणाऱ्या संस्था स्थानिक रहिवाशी यांचा तीव्र विरोध आहे. 30 कि. ली. प्रतिदिन क्षमता असताना दूषित पाण्याने पुरंदावडे सदाशिवनगर व अन्य गावातील स्थानिक नागरिक शेतकरी त्रस्त आहेत. पहिल्यांदा दूषित पाण्याचा बंदोबस्त करा आणि मगच विस्तारीकरण करा, असा स्थानिक नागरिकांचा सूर येत आहे.

प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी पदाधिकारी व नेते हवेत आहेत. शेतकरी व स्थानिक नागरिक मात्र दूषित व खराब पाण्याने त्रस्त आहेत. पीडित शेतकरी व स्थानिक नागरिक तसेच पर्यावरणविषयी काम करणाऱ्या संस्था जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button