सातासमुद्रापार दुमदुमला विठूनामाचा गजर! लंडनहून निघालेली ऐतिहासिक ‘ग्लोबल दिंडी’ पंढरपूरच्या वाटेवर…

लंडन ते पंढरपूर ! 11 देश, 50 दिवस अन् शेकडो विठ्ठल भक्त, जगातील पहिली ग्लोबल दिंडी
लंडनच्या रॉयल विंडसर रेसकोर्सवर घुमला ‘ज्ञानोबा-तुकारामाचा’ गजर
सातासमुद्रापार विठूनामाचा गजर
लंडनहून पंढरपूरसाठी ‘ग्लोबल वारी’ रवाना
पंढरपूर (बारामती झटका)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रात वारकऱ्यांची लगबग सुरू असतानाच, यंदा सातासमुद्रापार एक नवा इतिहास घडला आहे. ‘विठ्ठल… विठ्ठल’ असा गजर करत लंडनच्या रॉयल विंडसर रेसकोर्स वरून निघालेली पहिलीवहिली ‘ग्लोबल वारी’ आता ११ देशांचा प्रवास करून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. ६ जून रोजी लंडनमधून प्रस्थान झालेली ही दिंडी तब्बल ५० दिवसांचा प्रवास करून २५ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी थेट पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.
११ देश आणि ५० दिवसांचा अखंड प्रवास
लंडनस्थित ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’ आणि अनिवासी भारतीय विठ्ठल भक्तांच्या पुढाकाराने या अनोख्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी केवळ लंडनपुरती मर्यादित नसून ती नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, रोमानिया आणि तुर्की अशा विविध देशांतून मार्गक्रमण करणार आहे. हातात भगव्या पताका, कपाळी गंध आणि मुखात विठूनामाचा जप करत शेकडो परदेशी वारकरी या जागतिक दिंडीत सहभागी झाले आहेत.
“लंडनमध्ये साकारणार भव्य विठ्ठल मंदिर”
या वारीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लंडनमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा प्रचार करणे हे आहे. युरोपमधील नवीन पिढीला वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी आणि जगभरात विश्वशांतीचा संदेश जावा, यासाठी या ‘ग्लोबल दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीच्या माध्यमातून विठुरायाचा विचार आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
‘ग्लोबल वारी २०२६’
- प्रस्थान: ६ जून २०२६ (लंडन, युके)
- आगमन: २० जुलै २०२६ (पंढरपूर, भारत)
- एकूण प्रवास: ५० दिवस
- मार्ग: लंडन ते पंढरपूर (११ देशांतून रस्ते मार्गाने)
- सहभागी: लंडन आणि युरोपमधील शेकडो अनिवासी भारतीय
डॉ. अनिल खेडकर
Trustee
Shree Vitthal Rukmini temple UK
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



