सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य राजीव यादव सेवानिवृत्त

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
टाकळी सिकंदर येथील सरस्वती विद्यालय व कर्मवीर भिमराव महाडिक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव विठ्ठल यादव व पर्यवेक्षक अशोक जाधव हे प्रदीर्ध सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून निरोप देऊन सन्मान करण्यात आला.
इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेतील प्रथम तीन क्रमांक, इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच एन.एम.एम.एस. व स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. पालक, विद्यार्थी व सहकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर गायकवाड यांनी केले तर आभार मंगेश मोरे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



