विजयश्री गायकवाड यांचा सेवा निवृत्ती निमित्त सन्मान

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
मोहोळ येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य सौ. विजयश्री गायकवाड यांचा सेवा निवृत्ती निमित्त संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. त्या तंत्र स्नेही शिक्षिका म्हणून परिचित आहेत. गणित सारखा अवघड विषय सोपा करून अद्यापन करायच्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील गणिता विषयीची भीती दूर केली. त्या संयमी शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय कर्तव्यनिष्ठ म्हणून परिचित आहेत. त्यांनी शाळेत अनेक विधायक उपक्रम राबविले. त्यांना अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीयआदर्श शिक्षिका पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले. त्यांनी 33 वर्षे प्रामाणिक पणे सेवा बजावली. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत.
त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष यशवंत गुंड, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव तथा प्राचार्य सुधीर गायकवाड, शालेय समितीच्या चेअरमन श्रीमती रंभादेवी गुंड, संचालिका श्रीमती विमल गायकवाड, युवराज भोसले, प्राथमिक विभागाचे चेअरमन सचीन गायकवाड, पर्यवेक्षक नानासाहेब ताकमोगे, बापूसाहेब दळवे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



