श्रीराम बंगला महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे सत्ता केंद्र बदले…

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी नवनिर्वाचित बिनविरोध उपनगराध्यक्ष श्री. तानाजी भगत यांचा सन्मान केला…
सदाशिवनगर (बारामती झटका)
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीमध्ये मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक श्री. भीमराव रेडे पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपचे श्री. तानाजी नवनाथ भगत यांची बिनविरोध निवड झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी नवनिर्वाचित महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे बिनविरोध उपनगराध्यक्ष श्री. तानाजी भगत यांचा सन्मान केला.


यावेळी महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे गटनेते राहुल आप्पा रेडे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, नगरसेवक निनाद पटवर्धन, नगरसेवक विक्रम लाटे, नगरसेवक मोहसीन पठाण, नगरसेवक प्रकाश नवगिरे सर, नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण, नगरसेवक नामदेव इंगळे, नगरसेवक ॲड विजयराव भगत, अमर गुंड, सतीश पवार रमेश देवकर प्रताप लोंढे, ज्येष्ठ नेते मौल्लाभाई पठाण, म्हणून सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब लाटे पाटील, बापू रेडे, अक्षय मुंडफणे, सोनु जाधव, जयंत भगत, रोहित जगताप, दादा वाघ, दिपक पांढरे, दादा चव्हाण, दादा शिंदे, सौदागर रेडे, बाळासाहेब तुकाराम जाधव, सुरेश भगत, नवनाथ भगत, बाळासाहेब भगत, संजय भगत, शिवाजी रेडे, सतीश हाके, अजित भोसले, सुभाष गुरव, नागेश भोसले, श्रावण भोसले, जगन्नाथ गणेश कर, पोपट कदम, झगडे काका आदी मान्यवर उपस्थित होते..
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माढा विधानसभेचे षटकार माजी आमदार बबनदादा शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत शिंदे यांच्या सहकार्याने लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या नगरसेवकांची बैठक घेऊन विचार विनिमय केलेला होता. पालकमंत्री खासदार, आमदार यांच्यावर विश्वास ठेवून मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक असणारे नगरसेवक यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराने एक दिलाने काम करण्याचे ठरल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये श्री. तानाजी भगत व सोमनाथ मुंडफणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला होता.

कार्यालयीन कामकाजामध्ये कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोकराव चव्हाण यांना जाणीवपूर्वक विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करणारे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केलेला होता. सध्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व अनेक नगरसेवक असल्याने महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचा रखडलेला विकास पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या कार्याविषयी आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. श्रीराम बंगला महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे सत्ता केंद्र बनलेले आहे. नगरपंचायतीच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा कामाचा माणूस म्हणून राम सातपुते यांच्याविषयी महाळूंगकरांमध्ये आत्मीयता निर्माण झालेली आहे. लवकरच महाळुंगच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन व अन्य योजनेमधून निधीमुळे महाळुंग गावच्या विकासाला चालना मिळणार आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



