सोलापुरात काँग्रेसच्या बॅनरला भाजपचे प्रत्युत्तर; सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा, बॅनर सोलापुरात

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माण तालुका पंचायत समिती सभापती निवडीच्या अभिनंदनचे पोस्टर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी जाणीवपूर्वक सोलापुराच्या सात रस्ता चौकात लावून जयकुमार गोरे यांना डीवचले होते.
या बॅनरची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. काँग्रेसने त्या बॅनरवर अपनी ताकद पर इतना घमंड मत करना ! माना की आज तुम बलवान हो लेकीन याद रखना ! समय आपसे भी बडा बलवान होता है….! असे लिहिले होते.
पण, आता याच बॅनरला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देताना सोलापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झाल्याचा जल्लोषाचे बॅनर लावले आहे.
त्या बॅनरवर “अभी तो नापी है, मुठ्ठीभर जमीन हमने, अभी पुरा आसमान बाकी है” असे म्हणून काँग्रेसच्या बॅनर ला प्रत्युत्तर दिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



