तरंगफळ गावच्या श्रीमती जगुबाई मारुती जानकर यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड..

तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ, ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी श्रीमती जगुबाई मारुती जानकर यांचा एकमेव अर्ज आलेला असल्याने बिनविरोध उपसरपंच पदाचा मार्ग मोकळा झालेला आहे..
तरंगफळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या रिक्त जागी श्रीमती जगुबाई मारुती जानकर यांनी शुक्रवार दि. ९/१०/२०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आलेला आहे. दोन वाजता उपसरपंच पदाची निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. सुनील विठ्ठल जाधव अधिकृत घोषणा करतील. त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहकार्य ग्रामपंचायत अधिकारी तरंगफळ श्री. एस. एच. भांडवलकर हे करीत आहेत.
श्रीमती जगुबाई मारुती जानकर यांचे ८१ वर्ष वय आहे. त्यांचा सामाजिक व राजकीय कार्यामध्ये नेहमी सहभाग असतो. मारुती जानकर हयात असताना जगूबाई जानकर यांनी मायाक्का देवीच्या सवासणी कार्यक्रम परिसरामध्ये कोणीही केलेला नाही अशा पद्धतीने केलेला होता. पतीच्या निधनानंतर त्या आपला मुलगा गोरख जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्या आहेत.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग सेवा संस्था तरंगफळ संस्थापक अध्यक्ष गोरख जानकर यांनीही आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली समाजामध्ये दिव्यांग बांधवांचे अडीअडचणीत काम करून त्यांनाही सहकार्य केलेले आहे. जगूबाई यांचं एवढं वय होऊनसुद्धा त्यांनी समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. ट्रॅक्टर चालवणे, पिकांची गोफनीद्वारे राखण करणे, नातींचा शाळेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर कौतुक करणे, नातींच्या व नातवांच्या लग्नामध्ये मित्रपरिवार नातेवाईक यांची सर्वांची उठाठेव करणे, सध्या जगूबाई आजीच्या पणजी झालेल्या आहेत. तरीसुद्धा त्यांच्यामधील उत्साह व समाजसेवा करण्याचे कार्य सुरूच आहे.
माळशिरस तालुक्यात ८१ वर्षाच्या महिला बिनविरोध उपसरपंच होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. अशा कर्तृत्ववान बिनविरोध उपसरपंच जगूबाई जानकर यांच्या भावी राजकीय कारकीर्दीस बारामती झटका परिवार यांचे कडून खूप खूप शुभेच्छा आहेत…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



