कानून के हाथ लंबे होते है…

पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या खाजगी सावकार सागर उरवणे कानाला लागले परंतु कायदा कानूनने घेरले.
गणपती उत्सवात वृक्षारोपण करण्यासाठी आलेले होते, कायद्याच्या कचाट्यातून वाचण्याचा नाद केला पण वाया गेला….
पुरंदावडे (बारामती झटका)
सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी गणपती उत्सवात जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा संकल्प केलेला होता. गणपती उत्सवात गणेश मंडळ वृक्षारोपण कार्यक्रम घेतील, त्यांच्या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या मंडळाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत होते.
असाच सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये गणपती उत्सव मंडळाने वृक्षारोपण कार्यक्रम ठेवलेला होता. सदरच्या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी उपस्थित राहिलेले होते. त्यावेळेस मंडळातील कार्यकर्तेही आवर्जून उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सागर जयराम उरवणे यांनी श्री. अतुल कुलकर्णी यांच्या समवेत चालत असताना कानात श्री. दीपक गोरे यांनी केलेल्या तक्रारी विषयी चर्चा केलेली होती.

सदरचे फोटो स्वतःच्या फेसबुक वर अपलोड केलेले होते. त्यामुळे श्री. दीपक गोरे यांच्या तक्रारी विषयी तर्कवितर्क झाले होते. मात्र कानून के हाथ लंबे होते है, याचा प्रत्यय माळशिरस पोलीस स्टेशन येथे खाजगी सावकार म्हणून सागर जयराम उरवणे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या खाजगी सावकार सागर उरवणे कानाला लागले परंतु, कायदा कानूनने घेतले.
गणपती उत्सवात पोलीस अधीक्षक वृक्षारोपण करण्यास आले होते. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्याचा नाद केला पण वाया गेला, अशी पुरंदावडे सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये चर्चा सुरू आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



