ताज्या बातम्याराजकारण

उत्तमराव जानकर यांचा आमदार म्हणून सत्कार करणार नाही मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून आदर राखणार.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांचा सत्कार आमदार म्हणून करणार नाही मात्र, माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आदर राखणार असल्याची भूमिका बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी स्पष्ट केलेली आहे.

माळशिरस विधानसभा निवडणुकीत 254 अनुसूचित जाती मतदार संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्तमराव जानकर यांच्यासह दहा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये माळशिरस तालुक्याच्या उपेक्षित वंचित भागांना न्याय दिलेला होता. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा केलेली होती. त्यामुळे बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी तालुक्याचा एक जबाबदार नागरिक या नात्याने महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विचारांच्या लोकांसमवेत काम केलेले होते. सदरच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राम सातपुते यांचा निसटता पराभव होऊन उत्तमराव जानकर आमदार झालेले आहेत. आ. उत्तमराव जानकर यांचे निवडणुकीत काम केलेले नसल्याने त्यांचा आमदार म्हणून सत्कार करण्याचा नैतिक अधिकार नाही मात्र, माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून समोर आल्यानंतर त्यांचा आदर राखणं ही आपली भारतीय हिंदू संस्कृती आहे. अशा संस्कृतीत व आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेले श्रीनिवास कदम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.

माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात आ. उत्तमराव जानकर यांचा संघर्ष सुरू होता. त्यावेळेला कोणी पत्रकार एक ओळ सुद्धा बातमी लिहीत नव्हते‌. त्यावेळेस साळूबाई वार्तापत्र व बारामती झटका साप्ताहिक मधून पूर्ण पान बातमी देऊन समाजामध्ये उत्तमराव जानकर यांचे विचार रुजवलेले आहेत. त्यामुळे व्यक्तिगत संबंध कायम राहतील. मात्र, महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या सांगता प्रचार सभेच्या वेळी जाहीर सभेत बोलताना सांगितले होते, ते तंतोतंत पाळणार आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये पुढील पत्रकारिता व राजकीय वाटचाल पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दमदार माजी आमदार राम सातपुते, संघर्ष चळवळीचे प्रणेते ॲड. सुभाष अण्णा पाटील, त्यागी नेतृत्व ॲड. संजीवनीताई पाटील, युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे, माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या विचाराने महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय आठवले गट, कवाडे गट, शितोळे नानांची फौज, रयत क्रांती संघटना, यामधील राज्य, जिल्हा, तालुका व गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या विचारावर स्वाभिमानाने पत्रकारिता सुरू ठेवणार आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस यांच्या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांशी राजकीय संबंध न ठेवता व्यक्तिगत सलोखा कायम राहील. सर्वांच्या सुखदुःखामध्ये, घरगुती कार्यक्रमात पूर्वीप्रमाणे सहभागी राहणार आहेत. लाचारीची एक भाकरी खाण्यापेक्षा स्वाभिमानाची चतकोर भाकरी खाऊन वंचित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी असाच संघर्षाचा लढा पुढे सुरू ठेवणार असल्याची आपली भूमिका बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी स्पष्ट केलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

9 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button