…अन्यथा जलसमाधी घेऊ, ऊस वाहतूकदार संघटनेचा इशारा, ऊस वाहतूकदार पुन्हा एकवटले
फसवणूक करणाऱ्या ऊसतोड मुकादम यांच्यावर गुन्हे दाखल करा, मागणीने पुन्हा जोर धरला…
अकलूज ( बारामती झटका)
महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, मध्य प्रदेश, गुजरात या भागातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूकदार, ऊसतोड मजूर आणत असतात. त्यासाठी कारखाने ऊस वाहतूकदार यांना ऍडव्हान्स म्हणून काही रक्कम देतात. वाहतूकदार स्वतः जवळील सोनेनाणे गहाण ठेवून खाजगी सावकारांकडून पैसे उचलून ऊसतोड मजुरांना व मुकदमांना ऊसतोड करण्यासाठी देत असतात. मुकदम मंडळी याचा करार करूनसुद्धा ऊस तोडीसाठी येत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूकदार यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होते. याची जबाबदारी सरकार कारखाने घेत नाहीत. असे प्रकार वारंवार घडत असून हजारो कोटीची फसवणूक सध्या सुरू आहे.
विरोधी पक्षनेते यांनी उपस्थित केलेल्या ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीच्या प्रश्नाबाबत नागपूर येथील अधिवेशनामध्ये फसवणूक करणाऱ्या ऊसतोड मुकदमाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात आश्वासन दिले होते. परंतु तीन महिने उलटून सुद्धा ऊसतोड मुकदमाविरोधात आजतागायत गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. ऊसतोड मुकुदमाविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यासंबंधी पोलीस प्रशासनाला आपणाकडून त्वरित आदेश व्हावेत. अन्यथा, दि. १ एप्रिल २०२३ रोजी ऊस वाहतूकदार उजनीमध्ये जल समाधी घेणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रशांतभाऊ रुपनवर, उपाध्यक्ष ज्योतीराम चव्हाण, कार्याध्यक्ष कैलास पवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य रमजान इनामदार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very informative and funny! For further reading, check out: DISCOVER HERE. What’s your take?