ताज्या बातम्या

कायद्याच्या चौकटीत राहून सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार – सई भोरे पाटील

संग्रामनगर (बारामती झटका)

माझा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे. जे जमतंय ते करणार आणि जेवढं समाजासाठी करता येईल तेवढं करणार, असे मत माळशिरस तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी तथा डीवायएसपी डॉ. सई भोरे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनी गुरुवार दि. 6 जुलै रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, अकलूज येथे पदभार स्वीकारला. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्न जाणून घेतले.

पुढे बोलताना सई भोरे पाटील म्हणाल्या, येईल त्या अडचणींना तोंड देत गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, हा माझा प्रामाणिक हेतू असेल. कायद्याच्या चौकटीत राहून जनतेसाठी मी जे काही करता येईल ते करणार असून जनतेनेही सामाजिक व्यवस्थेचा आदर करावा, असेही डॉ. सई भोरे पाटील म्हणाल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. This article is fantastic! The insights provided are very valuable. For those interested in exploring more, check out this link: LEARN MORE. Looking forward to the discussion!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort