ताज्या बातम्यासामाजिक

रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ “जेल” मध्ये गेल्याशिवाय सचिव ज्ञानदेव राऊत यांना “बेल” होत नाही.

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना सात दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली होती‌. त्यानंतर मॅजेस्टिक कस्टडीत जाऊन सुद्धा मेहरबान न्यायालय यांनी जामीन फेटाळला आहे. रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ जेलमध्ये गेल्याशिवाय सचिव ज्ञानदेव राऊत यांना बेल होत नाही, अशी सहकार क्षेत्रात चर्चा सुरू आहे. तक्रारीमध्ये संगणमत असा उल्लेख असल्याने सचिवाबरोबर चेअरमन सुद्धा जबाबदार असतात‌. संचालक मंडळ बैठकीत मंजुरी देत असतात. त्यामुळे संचालक मंडळ सुद्धा सदरच्या प्रकरणात सहभागी असतात, अशी बँकिंग क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे…

रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सदाशिवनगर, ता. माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव पांडुरंग राऊत, संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याबाबत तसेच खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रितम शशिकांत दोशी रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे सर्व रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस यांच्या विरोधात अवैध सावकारी करणे, ज्यादा वसुलीसाठी धमकावणे व जागा हडप करणे अशा तक्रारीवरून माळशिरस पोलीस स्टेशन येथे एफ आय आर नंबर 493 गुन्हा नोंद झालेला होता. सदरच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406, 465, 468, 471, 506, 34 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39, 41, 45 कलमा अन्वये गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्याचा माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विशाल नवले तपास करीत आहेत.

माळशिरस पोलीस यांनी तक्रार दाखल होताच सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना अटक केलेली होती. चेअरमन, संचालक मंडळ व खाजगी सावकार यांची शोध मोहीम सुरू होती. सदाशिवनगर पंचक्रोशीत आरोपी शोधण्यासाठी शासकीय गाडी फिरत असल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र सचिव सोडून इतर लोकांना अटक का झाली नाही, याचीही उलट सुलट चर्चा सुरू आहे.

चेअरमन, संचालक मंडळ व सावकार यांना अटक का झाली नाही, याची नाट्यमय घटना सविस्तर माहिती घेऊन दिली जाणार आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button