ताज्या बातम्याराजकारणशैक्षणिक

देवाभाऊ, जयाभाऊ, रामभाऊ यांचे परफेक्ट नियोजन, मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणार….

पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाचे भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री‌ कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांच्या विजयाची रणनीती ठरली…

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचा विजयाचा अश्वरथ सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना समवेत घेऊन सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर महानगरपालिका व ग्रामीण जिल्ह्यातील पंचायत समिती यामध्ये भारतीय जनता पार्टीने दैदीप्यमान यश संपादन केलेले आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गायकवाड व डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांना माळशिरस तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांनी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून मतदारांच्या यादीचे अवलोकन केलेले आहे.

तालुक्यातील कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचवून भविष्यात शिक्षक व पदवीधर आमदार यांचा जाहीरनामा समोर ठेवून मतदारांना उमेदवाराच्या भूमिका समजावून सांगत आहेत. माळशिरस तालुक्यात मतदारांची संख्या सर्वात जास्त असल्याने पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाचे भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांच्या विजयाची रणनीती ठरलेली आहे.

देवाभाऊ, जयाभाऊ, रामभाऊ माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशी राजकीय परिस्थिती निर्माण केलेली आहे. माळशिरस तालुक्यात पदवीधर मतदार 6517 आहेत तर शिक्षक 1269 आहेत. पदवीधर साठी माळशिरस येथे तीन, अकलूज येथे चार, दहिगाव एक, नातेपुते दोन, वेळापूर दोन, पिलीव एक अशी बुथ रचना आहे तर शिक्षक साठी माळशिरस एक, अकलूज एक, दहिगाव एक, नातेपुते एक, वेळापूर एक अशी बुथ रचना राहणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button