ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

दादासाहेब आणि भैय्यासाहेब यांनी माळशिरस तालुक्यात विकासकार्यातून जनसामान्य माणसात रक्ताचं नातं निर्माण केलं.

महाळुंग (बारामती झटका)

माढा विधानसभा मतदार संघाचे पाणीदार आमदार बबनराव शिंदे उर्फ दादासाहेब आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजीतसिंह शिंदे उर्फ भैय्यासाहेब यांनी माढा विधानसभा मतदार संघात माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या गावांमध्ये विकास कार्यातून जनसामान्य माणसात रक्ताचे नाते निर्माण केलेले आहे.

माढा विधानसभा मतदार संघाचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या बहात्तरव्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे भव्य रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. ०१/०९/२०२३ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेमध्ये ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, श्रीपुर, ता. माळशिरस, येथे माननीय आमदार बबनदादा शिंदे समर्थक माळशिरस तालुका व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर श्रीपूर गट ऑफिस यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार बबनदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

रक्तदान चळवळ व्हावी, समाजामधील गरजू लोकांना रक्ताची आवश्यकता असल्यास अडचण भासू नये, यासाठी माळशिरस तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे समर्थक यांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून रक्तदान शिबिरामधून झालेल्या रक्तदान मधील १० नंबर निवडून त्या रक्तदात्यास लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक बक्षिसे ठेवलेली आहेत. त्यामध्ये पाठीवरील स्प्रे पंप, जिओ मोबाईल, स्मार्ट वॉच, मिक्सर अशा भेटवस्तू लकी ड्रॉ मधून देणार आहेत. तर प्रत्येक रक्तदात्यास एक भेटवस्तू दिली जाणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप व आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

पाणीदार आमदार बबनदादा शिंदे व युवा नेते भावी आमदार रणजीतभैया शिंदे यांनी माढा विधानसभा मतदार संघातील माढा तालुक्यातील जनता व मतदार यांच्यावर जेवढे प्रेम करीत आहेत तेवढेच प्रेम माढा विधानसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील समाविष्ट असणाऱ्या गावातील जनता व मतदार यांच्यावर दादासाहेब आणि भैय्यासाहेब यांचे विशेष लक्ष असून विकास कार्यातून सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे. जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन कायम त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये दादा व भैय्या कायम सहभागी असतात.

नेत्याच्या वाढदिवसाला सर्वसामान्य जनता रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करीत असतात. खऱ्या अर्थाने दादासाहेब आणि भैय्यासाहेब यांनी माळशिरस तालुक्यात विकास कार्यातून जनसामान्य माणसात जिवाभावाचं आणि रक्ताचं नातं निर्माण केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button