राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुका दिनदर्शिकाचे प्रकाशन.
मुंबई ( बारामती झटका )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबई येथील शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या माळशिरस तालुका दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब कर्चे, प्रशांत इंगळे, अमर कुलकर्णी, जैनुद्दीन शेख, संतोष टेळे, माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक कैलास वामन, माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांनी तालुक्यात, वाड्या वस्त्यांवर, गावागावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाळेमुळे रुजवलेली आहेत. ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येयधोरणे व राजसाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरेशभाऊ यांनी केलेले आहे. समाजामध्ये सामाजिक कार्याबरोबर सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलने, मोर्चे, रास्ता रोको करून सर्वसामान्य जनता व शेतकरी बांधव यांना न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक, राजकीय कार्यातून सुरेश भाऊ यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. सालाबादप्रमाणे याहीवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबई येथील शिवतीर्थ येथे दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडून हार्दिक शुभेच्छा !!!
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng