लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण संपन्न होणार…..
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 01 मे 2023 रोजी सकाळी 08.00 वाजता तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते तहसील कार्यालयाचे प्रांगणात राष्ट्रध्वजवंदन समारंभ संपन्न होणार आहे. सदरचा कार्यक्रम माळशिरस तहसील कार्यालयाचे तहसीलदार तुषार देशमुख यांच्या नियंत्रणात होणार आहे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद राष्ट्रीय पोशाख परिधान करून समारंभास उपस्थित राहणार आहेत.
माळशिरस तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाचा ध्वजारोहण समारंभ सकाळी 7:15 पूर्वी किंवा 9.00 वाजले नंतर आयोजित करण्याच्या सूचना आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng