Uncategorized

हरभरा उत्पादनवाढीची सुत्रे – श्री‌. सतिश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी

माळशिरस (बारामती झटका)

हरभरा पिकाचे आहारातील महत्व व पोषण मुल्य पोटाचे आजार व रक्त शुद्धी या औषधी गुणधर्माचा विचार करता हरभरा पिकाखालील क्षेत्राबरोबर उत्पादन वाढविणे व उत्पादन खर्च कमी करणे काळाची गरज आहे.

हरभरा उत्पादन वाढीची सुत्रे खालील प्रमाणे १. जमिन निवड – मध्यम ते भारी ६० सेमी खोल उत्तम निचरा होणारी भुसभुसीत उत्पादन वाढीचे गमक आहे. २. पेरणी कालावधी – उत्पादनवाढीचा व अपेक्षीत उत्पादनाचा महत्वाचा घटक आहे. हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यतच लागवड किंवा पेरणी करावी. १० नोव्हेंबर नंतर ३० नोव्हेंबर पर्यंत पेरणी केल्यास उत्पादनात २७ ते ४०% घट होते. पेरणी व टोकन ५ सेमी खोल ३० ते ४५ सेमी दोन ओळी व १० सेमी रोपातील अंतर ठेवूनच करावी. भारी जमिनित लागवड शक्यतो सरीवर टोकन पद्धतीने करावी. ३. बियाणे प्रमाण – हेक्टरी रोपाची संख्या राखण्यासाठी लहान बी जाती ६० किलो मध्यम बी – ७५-८० किलो व मोठे बी – १०० किलो प्रति हेक्टरी वापरावे काबुली जातीसाठी १२५ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे. ४. बीज प्रक्रिया – मर, मुळ कुज मान कुज रोग नियंत्रणासाठी ३ ग्रॅम ट्रायकोड्रमा किंवा कार्बेन्डेझिम किंवा मॅन्कोझेब प्रतिकिलो बियाणेस वापरावे. हवेतील नत्र स्थिर करण्यासाठी रायझोबीएम २५ ग्रॅम व जमिनितील स्फुरद उत्पलब्धा वाढविणेसाठी २५ ग्रॅम पी.एस.बी. प्रति किलो बियाणेस १२५ ग्रॅम गुळ प्रति लिटर पाणी व ५ थेंब निळचे द्रावण तयार करून बीयाणेस एकसारखे लावून सावलीत सुकवून पेरणी केल्याने उत्पादनात १० ते १५% वाढ होते. ५. खत नियोजन – माती परिक्षणावर आधारित २५ किलो झिंक सल्फेट + २५ किलो गंधक शेणखत मिसळून द्यावे. पेरणी वेळी २ चाड्याची पाभर याने बियाणे बरोबर १ पोते निम कोटेड युरिया + ३ पोती सिंगल सुपर फॉस्फेट + अर्धे पोते म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टर द्यावे. पिक फुलोऱ्यात असताना व तदनंतर १५ दिवसांनी २ मिली नॅनो युरिया फवारणी केल्याने १०% उत्पादनात वाढ होते. ६. पाणी व्यवस्थापन – वाढीच्या अवस्थेत २० ते २५ दिवसांनी, फुलोऱ्यात ४५ ते ५० दिवसांनी व घाटे भरणेचे अवस्थेत ६५ ते ७० दिवसांनी पोहच पाणी द्यावे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ३३% पाण्याची बचत होऊन १५% उत्पादनात वाढ होते. ७. घाटे अळी नियंत्रण – ७०% पर्यत नुकसान करणारी किड आहे. शेतात हेक्टरी ५ फेरोमेन ट्रॅप्स हेलिओथिस ल्युर्स वापरून मास ट्रॅपींग करणे. शेतात हेक्टरी २० पक्षी थांबे लावणे व प्रति मीटर १-२ अळ्या दिसून आलेवर ५% निंबोळी अर्क फवारणी करून किडीचा प्रार्दुभाव टाळता येतो. अळीचा प्रार्दुभाव ५% पेक्षा जास्त असेल तर इमामेक्टीन बेझोऐट २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केल्यास एकात्मिक नियंत्रण होते. ८. वाणांची निवड – यांत्रीक पद्धतीने काढणीस किड व रोग प्रतिबंधक १०५ दिवसास येणारा बागायत व जिरायत साठी उपयुक्त २२ क्वि. उत्पादन देणारा फुले विक्रम लोकप्रिय वाण आहे.

सर्वात लवकर येणारे ८५ ते ९० बागायत व जिरायतसाठी उपयुक्त व २३ क्विं प्रति हे. उत्पादनक्षमता असणारा लोकप्रिय वाण आहे. याबरोबर दिग्वीजय फुले विक्रांत, फुले विश्वराज, जाकी कांचन आकाश या वाणाचीही निवड करू शकता. काबुली वाण मध्ये कृपा व विराट ह्या जातीला प्राधान्य द्यावे. वेळेवर पेरणी, वाणाची निवड, बीजप्रक्रिया, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व एकात्मिक किड व्यवस्थापन या सुत्राचा वापर केला तर अपेक्षीत उत्पादन येण्यास तीळमात्र शंका नाही. म्हणून या सुत्राची अंमलबजावणी करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी माळशिरस कार्यालयाने केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button