देवाभाऊंचा वाढदिवस माऊली भाऊकडुन सेवाभाव म्हणून साजरा.

ईश्वर वठार (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष व कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मौजे ईश्वर वठार, ता. पंढरपूर येथे देवाभाऊंचा वाढदिवस माऊलीभाऊ यांच्याकडून सेवाभाव म्हणून साजरा करण्यात आला.
येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सरपंच नारायण देशमुख यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करून आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्र प्रथम व सेवाभाव या वृत्तीने राज्यामध्ये काम करीत आहेत. वंचित, शोषित, पीडितांचा कैवार घेत प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना राज्याच्या राजकारणामध्ये संधी देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी या महाराष्ट्राला आधुनिक युगाकडे घेऊन जात आहे. म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसासाठी संपूर्ण राज्यभरातील कार्यकर्ते हे विक्रमी रक्तदान करत असून याचे जागतिक रेकॉर्ड होणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता विभागाला अनेक जण आपले योगदान देत आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांची मुले शिकत असतात. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीनुसार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते घेतल्यामुळे माणूस गुरगरल्याशिवाय राहत नाही. गोरगरिबांच्या पोरांना शैक्षणिक साहित्याचा अभाव असतो, यामुळे सेवाभाव जपण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्य म्हणून आज ईश्वर वठार येथील शाळेमध्ये सरपंच नारायणराव देशमुख यांचे शुभ हस्ते व माऊली भाऊ हळणवर यांचे उपस्थित साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर गुंडगे, सोमनाथ खांडेकर, युवराज देशमुख, प्रशांत लवटे, अजय सरवदे, बापू बोरकर, संतोष मेटकरी, महेश सरवदे, अक्षय बोरकर, धनाजी देशमुख, बिराप्पा खरात, महादेव खांडेकर यांचेसह शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम भाजपचे राज्याचे सचिव माऊली भाऊ हळणवर व सहकारी यांनी केले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



