वेळापूर येथील श्री. रावसाहेब कृष्णराव माने देशमुख उर्फ आरके आबा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन….

वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर, ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार श्री. रावसाहेब कृष्णराव माने देशमुख यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवार दि. 20/05/2025 रोजी पहाटे 02 वाजता उपचारादरम्यान दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले महेश व विश्वजीत, एक मुलगी, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.
कृष्णराव माने देशमुख यांचा मोठा परिवार होता. त्यामधील श्री. रावसाहेब माने देशमुख उर्फ आर के आबा वेळापूर व पंचक्रोशीमध्ये सर्व परिचित होते. त्यांचा मनमिळावू व बोलका स्वभाव होता. आर के आबांवर वेळापूर-निमगाव रोडवरील माने देशमुख स्मशानभूमीमध्ये आजच सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. आर के आबांच्या दुःखद निधनाने माने देशमुख परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
आबांच्या आत्म्यास शांती लाभो व माने देशमुख परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.