सौ. संस्कृतीताई यांनी भूमाता व गोमाता यांची असणारी भारतीय हिंदू संस्कृती जोपासली
श्री संत बाळूमामा यांच्या पादुकांचे पूजन आमदार धर्मपत्नी संस्कृतीताई सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
धर्मपुरी ( बारामती झटका )
धर्मपुरी ता. माळशिरस येथील श्री संत बाळूमामा यांचे भक्त युवा नेते तेजस लालासो पाटील यांच्या निवासस्थानी श्री संत बाळूमामा यांच्या पादुका पूजनाचा कार्यक्रम माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृती राम सातपुते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.


यावेळी आमदार धर्मपत्नी संस्कृतीताई यांनी भूमाता व गोमाता यांची असणारी भारतीय संस्कृती जोपासली असल्याने लहानपणी आई-वडिलांनी दिलेली संस्काराची शिदोरी घेऊन समाजामध्ये सुसंस्कृतपणे वावरत असणाऱ्या संस्कृतीताई यांनी समाजासमोर वेगळा आदर्श ठेवलेला आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे छाया पाटील, अर्चना पाटील पूजा व स्नेहा पाटील यांनी संस्कृतीताई यांचा पाटील परिवार यांच्या वतीने सन्मान केला.
धर्मपुरी येथील युवा नेते तेजस लालासो पाटील यांनी श्री संत बाळूमामा यांच्या नावे गोशाळा सुरू केलेली आहे. श्री संत बाळूमामा यांच्या पादुका पूजनाचा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात आमदार धर्मपत्नी संस्कृतीताई यांच्या शुभहस्ते संपन्न झालेला आहे. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये स्वमाता ( स्वतःची आई ), भूमाता व गोमाता अशा तीन मातांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृतीताई यांनी मनोभावे गोमातेचे पूजन करून आशीर्वाद घेतलेला आहे. श्री संत बाळूमामा यांच्या पादुकांचे पूजन भक्तिमय वातावरणात केलेले आहे. संस्कृतीताई यांनी महाप्रसादाचा आस्वाद टेबल खुर्चीचा वापर न करता जमिनीवर भुमातेचा आदर करून सर्वांच्या सोबत आनंदाने मिळून मिसळून केलेला आहे. समाजामध्ये आपण पाहतो ग्रामपंचायत सदस्य, सरपंच किंवा बचत गट अध्यक्ष जरी झाले तरी वागण्या-बोलण्यामध्ये रूढी, चाली, परंपरा विसरून जात असतात. मात्र, संस्कृतीताई यांनी आई-वडिलांनी घालून दिलेला आदर्श जरी सध्या त्या आमदाराच्या धर्मपत्नी असल्या तरीसुद्धा नावातच संस्कृतपणा असणाऱ्या संस्कृतीताई भारतीय हिंदू संस्कृती जोपासत असल्याचे उपस्थितांनी पाहिलेले आहे. आमदारांची धर्मपत्नी म्हणून त्यांनी वेगळेपण दाखवून न देता सर्वसामान्य जनतेत मिळून मिसळून धार्मिक कार्यक्रम केलेला असल्याने उपस्थित श्री संत बाळूमामा यांच्या भाविकांमध्ये संस्कृतीताईंच्या सुसंस्कृतपणाविषयी आदराची भावना निर्माण झालेली आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng