ताज्या बातम्याराजकारण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संकल्प अभिषेक पदयात्रा संपन्न होणार…..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य राष्ट्रवादीचे नेते सुरेश आबा पालवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गिरीजापती मंदिर, नातेपुते ते शंभू महादेव मंदिर, शिखर शिंगणापूर संकल्प अभिषेक यात्रेचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी ७१ वर्षानंतर येणाऱ्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त संकल्प अभिषेक यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश आबा पालवे पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भैय्या भांड यांनी सोमवार दि. ०५/०८/२०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता नातेपुते येथील गिरिजापती मंदिर ते शंभू महादेव मंदिर शिखर शिंगणापूर पर्यंत संकल्प अभिषेक यात्रेचे आयोजन माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेले आहे. सदरच्या संकल्प अभिषेक यात्रेला सुरुवात सकाळी नातेपुते येथील गिरिजा पती मंदिर येथे अभिषेक करून नातेपुते येथून शिखर शिंगणापूरकडे कार्यकर्त्यांची पदयात्रा निघणार असून शिंगणापूर येथे शंभू महादेव मंदिर येथे महा अभिषेक केला जाणार आहे.

७१ वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणी महिन्याची सुरुवात सोमवार व श्रावण महिन्याचा शेवट सुद्धा सोमवारी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या श्रावण महिन्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेच्या मनामध्ये असणारी इच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार व्हावेत यासाठी माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संकल्प अभिषेक पदयात्रेचे आयोजन केलेले आहे. सदरच्या पदयात्रेत माळशिरस तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व महिला भगिनी, राज्य, जिल्हा, तालुका कार्यकारणीतील वेगवेगळ्या विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button