सौ. निलाबाई निवृत्ती जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…
मळोली गावचे माजी पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासो जाधव पाटील यांना मातृषोक…
मळोली (बारामती झटका)
मळोली, ता. माळशिरस येथील सौ. निलाबाई निवृत्ती जाधव यांचे रविवार दि. 09/06/2024 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने सायंकाळी 4.30 वाजता दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मळोली गावचे माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासाहेब जाधव पाटील यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर रात्री 10 वाजता मळोली येथील वैकुंठ भूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वर्गीय सौ. निलाबाई जाधव यांचा सुसंस्कृत स्वभाव होता. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना सुसंस्कार दिलेले आहेत. त्यांनी परिसरामध्ये आपल्या वागण्यामधून जनमानसामध्ये प्रतिमा निर्माण केलेली होती. पती निवृत्ती जाधव उर्फ नेवाबापू यांना प्रतिकूल परिस्थितीत मोलाची साथ दिलेली होती. दोघांनी मिळून दरिद्री संसाराचा स्वर्ग बनविलेला आहे.

सध्या सर्व काही व्यवस्थित असताना अचानक छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच प्राणज्योत मावळली. त्यांच्या दुःखद निधनाने जाधव परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. स्वर्गीय सौ. निलाबाई यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व जाधव परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे. रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 11/062024 रोजी सकाळी 7.30 वाजता वैकुंठ भूमी मळोली येथे होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.