चि. स्वप्निल केसकर (महाराष्ट्र पोलीस), डोंबाळवाडी व चि. सौ. कां. साक्षी शिंगाडे, मलठण यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक
श्री. महादेव दादासो केसकर
जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी सोलापूर
डोंबाळवाडी (बारामती झटका)
कै. दादासो पिराजी केसकर यांचे नातू व श्री महादेव दादासो केसकर, डोंबाळवाडी (कु.), ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे द्वितीय सुपुत्र चि. स्वप्निल (महाराष्ट्र पोलीस) आणि कै. गुलाबराव रावबा शिंगाडे यांची नात व श्री. महादेव गुलाबराव शिंगाडे रा. मलठण, ता. दौंड, जि. पुणे यांची सुकन्या चि. सौ. कां. साक्षी यांचा शाही शुभ विवाह सोहळा बुधवार दि. ०४/०६/२०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३३ मि. या शुभ मुहूर्तावर चैतन्य लॉन्स, धर्मपुरी-शिंदेवाडी रोड, शिंदेवाडी, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. महादेव दादासो केसकर जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनई चौघड्यांच्या मधुर स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण, सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचं नाजूक उन्मीलन, सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभाशीर्वाद व शुभेच्छांची सुखद रम्य पाखरंण, म्हणूनच या शाही शुभ विवाह सोहळ्यास सर्व नातेवाईक आप्तेष्ट, मित्रपरिवार व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून वधूवरांना अक्षतारुपी आशीर्वाद देण्यास उपस्थित राहण्याची विनंती केसकर परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केसकर परिवार व शिंगाडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.