ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

ॲड. एम. एम. मगर यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा सत्कार

वेळापूर (बारामती झटका)

दहावीच्या परीक्षेत वेळापूर केंद्रात प्रथम येणाऱ्या श्रीजीत जाधव याचा सत्कार आपला युवक शेतकरी फोरम चे संस्थापक अध्यक्ष ॲड. एम. एम. मगर व सौ. चित्रलेखा मगर यांच्या हस्ते करण्यात आला.

मोजे निमगाव (मगराचे) येथील जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ, निमगाव या शाळेतील श्री. बबन लक्ष्मण जाधव सर यांचा नातू व महेंद्र बबनराव जाधव सर यांचा मुलगा वेळापूर केंद्रात इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५% मार्क्स मिळवून पहिला आला. गावाच्या व शाळेच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. वेळापूर केंद्रात ८०० विद्यार्थ्यातून पहिला येणारा एकमेव विद्यार्थी आहे.

आपल्या शाळेचा व गावाचा विद्यार्थी पहिल्या क्रमांकात यावा, अशी आशा बाळगून असणारे श्री. बबन लक्ष्मण जाधव सर व प्रसिद्ध लेखक हनुमंत पवार सर यांचे मार्गदर्शन चि. श्रीजीत याला लाभले‌. त्याला पुढील शिक्षणासाठी व उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी त्याच शाळेचे माजी विद्यार्थी ॲड. एम. एम. मगर यांनी शुभेच्छा दिल्या. सत्कार प्रसंगी पिता पुत्र जाधव सर, मुलाची आई, आजी व सौ. चित्रलेखा मगर उपस्थित होते. त्या सर्वांनीच चि. श्रीजीतला त्याच्या यशाबाबत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button