चि. हनुमंत खरात व चि. सौ. कां. क्षितिजा कोल्हटकर, चि. आप्पासाहेब खरात व चि. सौ. कां. प्रियांका घुले, चि. नंदकुमार खरात व चि. सौ. कां. श्रावणी घुले, यांचा शाही शुभविवाह सोहळा.

प्रेषक
श्री. नामदेव ज्ञानोबा (आबा) झुरूळे.
ग्रामपंचायत सदस्य कोंडबावी.
श्री. संजय ज्ञानदेव खरात
IPS पोलीस अधीक्षक जि. अमरेली गुजरात.
श्री. कैलास (दादा) रामू खरात.
माळशिरस (बारामती झटका)
स्व. रामू कृष्णा खरात यांचे नातू व श्री. कैलास रामू खरात रा. वटपळी यांचे ज्येष्ठ चि. हनुमंत व श्री. नानासो अण्णा कोल्हटकर यांची नात व श्री. अजिनाथ नानासो कोल्हटकर रा. खुडूस यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. क्षितिजा, स्व. रामू कृष्णा खरात यांचे नातू व श्री. महादेव रामू खरात रा. वटपळी यांचे ज्येष्ठ चि. आप्पासाहेब व श्री. ज्ञानदेव खंडू घुले यांची नात व श्री. दत्तात्रय ज्ञानदेव घुले रा. वटपळी यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. प्रियांका घुले, स्व. रामा कृष्णा खरात यांचे नातू व श्री. कैलास रामू खरात रा. वटपळी यांचे द्वितीय चि. नंदकुमार खरात व स्व. जगन्नाथ बाबा घुले यांची नात व श्री. नामदेव जगन्नाथ घुले रा. पाटीलवस्ती यांची कन्या चि. सौ. कां. श्रावणी घुले यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दिनांक 22/11/2025 रोजी दुपारी 01 वाजून 05 मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस 61 फाटा, माळशिरस – अकलूज रोड, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे कोंडबावी ग्रामपंचायत सदस्य श्री. नामदेव (आबा) ज्ञानोबा झुरूळे, पोलीस अधीक्षक जि. अमरेली गुजरात आयपीएस अधिकारी श्री. संजय ज्ञानदेव खरात, श्री. कैलास (दादा) रामू खरात व समस्त खरात परिवार यांच्या वतीने शुभकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
शुभमंगल प्रसंगी पारिजातकाच्या वर्षावाप्रमाणे अक्षदाची उधळण आणि स्नेहमय आशीर्वादाची बरसात व्हावी, यासाठी आपणांस आग्रहाचे निमंत्रण. आपले नम्र सौ. किसनाबाई व श्री. भगवान रामू खरात, सौ. जिजाबाई व श्री. कैलास रामू खरात, सौ. शेषाबाई व श्री. महादेव रामू खरात, सौ. सविता व श्री. विठ्ठल रामू खरात आणि समस्त खरात परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते निमंत्रण अथवा आमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे ही विनंती खरात, कोल्हटकर व घुले परिवारांच्या वतीने शुभ कार्यास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



