चळवळीतील संघर्षयोद्धा आ. राम सातपुते यांनी चळवळीतील युवकांचा गुणगौरव केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या…
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भाषणामध्ये युवा त्रिमूर्तींचा गुणगौरव करून मनाचा मोठेपणा दाखवून दिला
माळशिरस ( बारामती झटका )
समाजामध्ये चळवळीतून संघर्ष करून समाज हिताची कामे करण्याकरता माळशिरस तालुक्यात ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे, अजितभैया बोरकर, सुरेशभाऊ टेळे यांची एकमेकांना कायम साथ असते. चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने तिघांचे योगदान असल्याचे आपल्या भाषणामध्ये चळवळीतील संघर्ष योद्धा आमदार राम सातपुते यांनी त्रिमूर्तींचा नामोल्लेख करून गुणगौरव केल्याने उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भाषणामध्ये जाहीरपणे जनतेसमोर युवा त्रिमूर्तींचा गुणगौरव करून मनाचा मोठेपणा दाखवून दिलेला आहे.
माळशिरस येथे हनुमान चौक, टेळे कॉम्प्लेक्स मध्ये फॅमिली सुपर बझारचे उत्साही वातावरणात व मोठ्या थाटामाटात उद्घाटन समारंभ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या संजीवनीताई पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंददादा कुलकर्णी, माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड साहेब, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख, लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरसचे माजी सरपंच राष्ट्रवादीचे नेते विकासदादा धाईंजे, डॉ. संजय सिद, माळशिरस नगर विकास आघाडीचे नेते ॲड. दादासाहेब पांढरे, रशीदभाई शेख, नगरसेवक कैलास वामन, नगरसेवक आबा धाईंजे, नगरसेवक महादेव कोळेकर, युवा उद्योजक नगरसेवक सचिनआप्पा वावरे, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, नगरसेवक प्रवीण केमकर, नगरसेवक दादासाहेब शिंदे, नगरसेविका रेश्माताई टेळे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत, अजय सकट, माजी नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे, माजी नगरसेवक भगवाननाना थोरात, माजी नगरसेवक मारुती उर्फ अप्पासो देशमुख, माजी नगरसेवक गंगाधर पिसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर, राष्ट्रवादी युवक माळशिरस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, चेअरमन शामराव वाघमोडे, देशमुख पट्टा विकास सोसायटीचे चेअरमन सचिन देशमुख, योगेश देशमुख, काकासाहेब पाटील, माळशिरसचे पोलीस पाटील शितल पाटील, राजाभाऊ वळकुंदे, मतीन बिद्रे, शहाजी देशमुख, प्रकाश आंबुडकर, बाळासाहेब वावरे, अर्जुन राऊत, ज्येष्ठ निवेदक एन. डी. पाटील, भगवान आबा सीद, अजीम मुलाणी, धुळदेव सिद, एम. डी. सीद, साधू माने, रामभाऊ जमदाडे, ॲड. दादासाहेब कोळेकर, ॲड. आकाश पाटील, ॲड. दत्तात्रय वळकुंदे, अरविंद लोंढे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व ग्रामस्थ, पत्रकार बांधव व टेळे परिवारातील सर्व सदस्य आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी फॅमिली सुपर बझारला शुभेच्छा देऊन माळशिरस विधानसभा मतदार संघांमध्ये विकास कामे करण्याकरता निधी कमी पडू दिला जाणार नाही. माळशिरस शहरांमध्ये सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून तालुक्यात ॲड. सोमनाथ वाघमोडे, अजितभैय्या बोरकर, सुरेशभाऊ टेळे यांनी तालुक्यात चळवळ टिकवली आहे. एकमेकांची साथ कायम असते, असा त्रिमूर्तींचा गुणगौरव करून मनाचा मोठेपणा दाखवून दिलेला आहे. कारण तिघांनी विधानसभेला आ. राम सातपुते यांच्या सोबत नव्हते तरीसुद्धा केलेल्या चळवळीतील कामाचा गुणगौरव करण्याकरता मनाचा मोठेपणा करून जिगर लागते. तीच जिगर लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दाखवून दिलेली असल्याने अनेकांच्या माना झुकलेल्या होत्या.
खरंच लोकप्रतिनिधी दिलदार मनाचा असावा याचा प्रत्यय लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या भाषणातून उपस्थितांना आलेला होता. गुपचूप फोनवर किंवा व्हाट्सअप वर कौतुक करणे वेगळे आणि जाहीर जनतेसमोर गुणगौरव करणे म्हणजे दिलदार मनाचा मोठेपणा दिसून आलेला आहे.
माळशिरस तालुक्यातील जनतेने व उपस्थितांमधील अनेकांनी ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी माळशिरस तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न लोणंद फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न, कॉरिडॉर एमआयडीसी प्रकल्पात तालुक्यातील गारवाड गावचा समाविष्ट करण्यासाठीचे प्रयत्न, आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेली विविध आंदोलने, सुरेशभाऊ टेळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विविध प्रश्नावर आंदोलने, रास्ता रोको केलेले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले होते तर, आभार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांनी मानले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, superb blog layout! How lengthy have you been running a blog for?
you make running a blog look easy. The entire glance of your web site is magnificent, as well as the content material!
You can see similar here dobry sklep
great article